file photo 
नागपूर

आईपासून विभक्‍त झालेली बिबट्याची पिल्ले गोरेवाड्यात 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात नव्याने बिबट्याच्या चार पिल्लांचे आगमन झाले आहे. अकोला वनविभागाअंतर्गत पातूर वनपरिक्षेत्रामधील पास्टूल येथील मोर्णा नदीच्या पात्रात ही पिल्ले आढळून आली होती. संगोपनाच्या दृष्टीने त्यांना गोरेवाडा प्रकल्पात ठेवण्यात आले आहे. 

मोर्णा नदीपात्रात 30 जून रोजी तीन पिल्ले आढळून आली होती. याच भागात 1 जुलैला पुन्हा एक पिल्लू आढळून आले. या पिल्लांना जन्म देणाऱ्या माता बिबट्याचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आला; पण त्याचा कोणताच फायदा होत नव्हता. अखेर पिल्लांच्या पुढील संगोपनासाठी त्यांना गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. अकोला वनविभागाचे सहायक वनसंरक्षक एन. सी. गोंडाणे व पातूरचे पनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने यांनी पिल्लांच्या स्थानांतरणासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण केली. गुरुवारी (ता. 16) दुपारी दीड वाजताच्या सुमारास चारही पिल्ले गोरेवाडा प्रकल्पात दाखल झाली. 

डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजित कोलंगथ, डॉ. शालिनी ए. एस. यांनी पिलांची तपासणी केली. त्यात चारही पिल्ले ठणठणीत आढळून आली. कुठल्याही बाह्य जखमा त्यांच्या शरीरावर दिसून आल्या नाहीत. या चारही पाहुण्यांची देखभाल आता गोरेवाडा प्रकल्पातच होणार आहे. पाहुण्यांच्या स्वागताप्रसंगी गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, सहायक वनसंरक्षक एच. व्ही. माडभूषी, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. भिवगडे, वनपाल आर. डी. वलथरे, वनरक्षक हरीश किनकर, आर. एच. वाघाडे उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT